Posts

OLD AGE HOME NASHIK

Priyadarshi Samrat Ashoka welfare foundation

Image
  वृद्धाश्रम म्हणजे नेमके काय.....     मी एका शेतकरी कुटुंबातील शेतमजूरी   करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला हे माझे भाग्य , माझे वडील शेतकरी शेत मजूर म्हणजे त्याच्या नशिबात दारिद्र्यच पाचवीला पुजून ठेवलेले जणू काय ? अशा परिस्थिती मला शिक्षण देणे हे त्यांच्या साठी खूप कठीण होते , गावात चौथी पर्यंतच शिक्षण पुढील शिक्षणासाठी शहराकडे जाने म्हणजे एक मोठी जीवनाची कसोटी   असायची. मी लहान वयात असतानी   आपला पोटचा गोळा दूर शहरात राहण्यास पाठवणे हे खूपच कठीण मायबापाला असते,आपला मुलगा आपल्या पासून दूर पाठवणे माय-बाप्पाला एक आपल काळीज तोडून फेकल्यागत वाटणे हे साहाजिकच आहे .जर मुलाला   पाठविण्याचा विचार केला. किंवा असे हे   शब्द जरी खेड्यातील लोकांपुढे मांडले तर लोकांची निंदानालस्ती पारावरच्या कठड्यावर बसून ऐकायला मिळायची,‘काय याला एकुलता एक पोरग’ पोसण होईन का ? . . . लय शिकून बॅरिस्टर होणार हाय! काय ? असे उदगार बापाला लोकांकडून निघायचे, बाप कसा आपल्या   हृदयावर धोंडा ठेऊन आपल्या मुलांच्या भविष्यांसाठी उन्ह,वारा,पाऊस,व गरीबीचे चटके खात, उपासीपो...